राष्ट्रीय पँथर्स आघाडी दापोली शाखेचे उद्घाटन ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न

पालघर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या दापोली शाखेचे उद्घाटन संघटनेचे सर्वेसर्वा अविशजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आले. यावेळी दापोली गावातील अनेक महिला , ग्रामस्थ व युवा वर्ग तसेच पँथरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सदर उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते. 
      संघटनेचे पालघर जिल्हा युवा संपर्क प्रमूख ॲड. अजिंक्य म्हस्के , दापोली ग्रामपंचायत सदस्य ॲड. परेश भोणे , चिंतामण शेलार , दिपाली भोणे यांच्या प्रयत्नांनी दापोली गावात संघटनेचे शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातील जेष्ठ , श्रेष्ठ ग्रामस्थांनी तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य व  गावातील महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर वर होत असलेल्या अन्याया बाबत, गावातील अनेक समस्या आणि अडीअडचणी बाबत , वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे उपस्थित पदाधिकारी यांना माहिती करून दिली. 
            यावेळी किरण हरिश्चंद्र भोणे यांची दापोली शाखा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच शशिकांत कमलाकर भोणे यांची शाखा उपाध्यक्ष , विद्धनेश जनार्दन भोणे यांची शाखा सचिव तर चंद्रकांत वासुदेव शेलार यांची शाखा सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली. महिला शाखा अध्यक्ष पदी आयु. रोशनी नंदकुमार भोणे  यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दापोली ग्राम शाखा सदस्य पदी महेंद्र शेलार , श्याम काशिनाथ मोरे , रविंद्र लक्षुमन भोणे ,  नंदकुमार आत्माराम भोणे , नितीन भगवान जाधव , भूपेश मधुकर कुर्ले , दर्शन राजेंद्र भोणे , प्रज्योत विनोद भोणे , हर्षल प्रमोद मोहिते , गणेश कमलाकर भोणे , दर्शन दिलीप भोणे ,भरत तुकाराम शेष ,चंद्रकांत सिताराम भोणे , अंकुश चिंतामण शेलार  , दिनेश तुकाराम शेष , चेतन बाबुराव भोणे , वसंत लक्षुमन भोणे , प्रशांत पंढरीनाथ भोणे  , सचिन शंकर भोणे , अल्का अनंत भोणे , शोभा पंकज भोणे यांच्या नियुक्त्या सदस्य पदी करण्यात आल्या. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनुष्का ताई शेलार , राजेंद्र गोपीनाथ भोणे, प्रमिला श्याम मोरे , देवेश्री महेंद्र शेलार , भामिनी बाबू भोणे , सविता राजेंद्र भोणे , हेमा शशिकांत भोणे हे ग्रामस्थ उपस्थीत होते.
                  यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे जिल्हा अध्यक्ष  विनायक जाधव ,कार्याध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख संतोषजी कांबळे , महासचिव लक्ष्मण रखमे,  वरिष्ठ कार्यकर्ते जगदीश राऊत , बिंबेश जाधव , भरत महाले , महिला जिल्हा अध्यक्षा विद्याताई मोरे , पालघर जिल्हा उपाध्यक्ष शिवप्रसाद कांबळे , जिल्हा प्रमुख सल्लागार उमेश कापसे ,  निलेश गायकवाड ,चंद्रसेन ठाकूर , संदीप राठोड ,अहमद खान ,  नसीम अन्सारी  , जावेद खान , निसार भाई शेख , महिला जिल्हा सल्लागार दिपाली ताई वानखेडे , पालघर तालुका अध्यक्ष  किशोर राऊत , पालघर तालुका महिला अध्यक्षा स्मिता ताई वानखेडे , गणेश राऊत , राहुल जाधव , पंकज जाधव , डहाणू तालुका सहकार्याध्यक्ष सुदाम दामले , वाणगाव शहर सचिव कल्पेश खरात , वाणगाव शहर संघटक उमेश पाईकराव , वाणगाव शहर युवा अध्यक्ष वेदांत वाडीया व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post