रेल्वेला चुना लावण्यासाठी उभारली अनधिकृत चाळ, बोईसर येथे भू माफियांचा हैदोस

बोईसर : पालघर जिल्ह्यात रेल्वे चे काम हे जोरात सुरू आहे. त्यात बक्कळ मोबदला लाटण्यासाठी बोईसर येथील भू माफिया यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
  बोईसर ग्रामपंचायत हद्दीत भू मफियांनी हैदास घातला असून शासनाची जागा बळकावत त्यावर एका रात्रीत च अवैध बांधकाम करीत असल्याचे समोर आले आहे. 
     मिळालेल्या माहितीनुसार पैशांच्या बक्कळ मोबदला मिळविण्यासाठी बोईसर ग्रामपंचायत च्या काही सदस्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रेल्वे च्या जागेवर अनधिकृत चाळ उभारली आहे. त्याला ग्रामविकास अधिकारी यांनी आपला पदाचा दुरपयोग करून जुनी घरपट्टी चढवली असल्याचे समजते आहे. 
बोईसर शहरात बी ए आर सी मध्ये जाणाऱ्या रेल्वे रूळ काढत तिथे जोरात काम सुरू केले आहे. मात्र भू माफियांनी याबाबत अनोखी शक्कल लढवत रेल्वे रुळालगत १५ ते २० खोलींची चाळ उभारली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार यात ग्रामपंचायत सदस्य यांच्याच हात असल्याने ते काम त्यांनी काही दिवसात पूर्ण केले असल्याचे समजते आहे. आणि त्यावर जुनी घरपट्टी चढविण्याचा प्रताप बोईसर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जे अवैध बांधकामांना नेहमीच अभय देणारे असल्याची त्यांची ओळख असणारे यांनी केले आहे.
आपल्या पदाचा गैर वापर करत शासनाचा पैसा लुबळण्याचे काम हे बोईसर शहरात जोरात सुरू आहे. त्यात भवानी चौक येथील आंगणवाडी च्या बाजूला देखील अनधिकृत बांधकाम पूर्ण झाले असून शासनाला कसे लुबळता येईल यात भू माफिया हे रोज नव नवीन शक्कल लढविताना दिसून येत आहेत. त्यात आपले बोईसर ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी हे अगदी प्रामाणिक पणे अनधिकृत बांधकामाला अभय देत घरपट्टी चढविण्याचे काम करतात. म्हणून त्यांची बदली बोईसर शहरातून झाल्या नंतर अगदी काही महिन्यातच त्यांनी बोईसर शहरात पुन्हा ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. 
ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या फायद्या साठी शासनाला लुबळण्याचा जो प्रकार केला आहे त्यात अतिक्रमणे केल्या प्रकरणी त्यांचे पदे देखील जाऊ शकतात. 
   अशा लोकांना त्यांना साथ देणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर पदाचा दुरुपयोग केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या वर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Previous Post Next Post