महाविकास आघाडी कडून डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला . डहाणूच्या सागर नाका ते डहाणू प्रांत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढत यावेळी महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं . यावेळी माकपा, महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिलांनी देखील सहभाग घेतला होता . तर सद्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे हुकूमशाही पद्धतीने वागत असून जनतेला बदल हवाय त्यामुळे जनता पुन्हा एकदा माझ्या पाठीशी नक्कीच राहील असा विश्वास यावेळी निकोले यांनी व्यक्त केला . 2019 साली आपण राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून निवडून आलो होतो आणि या वर्षी देखील राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणूनच निवडून येईन असा विश्वास देखील यावेळी निकोले यांनी व्यक्त केला .