बोईसर : बोईसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होणार, असे चित्र सुरवातीला दिसुन येत असून ज्याप्रमाणे
बोईसर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
महायुती मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे ह्यांच्या प्रचाराचा श्रीफळ फोडून जोरदार प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केला असून ह्या प्रचारामध्ये बोईसर विधानसभेतील बरीचशी गावे पिंजून काढण्यात आली आहेत.
बोईसर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व राहिला आहे. २००९ साली बोईसर विधानसभा गट निर्माण होऊन बहुजन विकास आघाडीकडून संधी मिळालेल्या विलास तरे यांनी झेंडा फडकवला होता. २०१४ साली देखील विलास तरेच विजयी झाले होते. मात्र २०१९ साली विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. परंतु युती धर्म न पाळल्यामुळे बंडखोर उमेदवारांनी तरे यांची मत खाऊन बविआचे राजेश पाटील यांना अवघ्या काही मतांनी विजयी होण्यास मार्ग सुकर केला होता. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर विलास तरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पालघर व बोईसर विधानसभेची जागा ही शिवसेना गटाला गेल्याने बोईसर विधासभेकरता विलास तरे यांना उमेदवारी जाहीर करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षा कडून अधिकृत उमेदवार म्हणून विलास तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीचे बीगुल वाजताच निवडणुकीकरिता रिंगणात उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांनी आपली रणनीती आखत जोरदार प्रचार सुरू केलेला असताना शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे ह्यांच्या प्रचार रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत छटपूजा असल्याने बेटेगाव, मंगलमूर्ती नगर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार व महिला भगिनी एकत्र जमल्या असल्याने त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे ह्यांनी हजर राहून त्यांचा आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर विचारविनिमय केला.
ह्या प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख निलम संखे, भारतीय जनता पार्टीचे माजी कृषी सभापती अशोक वडे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राहुल, प्रशांत संखे, मुकेश पाटील,अतुल देसाई, अजय दिवे, अजय ठाकूर, महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी ,शिवसैनिक युवा सैनिक, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.