पालघर: फेब्रुवारी मार्च २०२४ मधील घेण्यात आलेल्या इ.१० वी (माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील ३२१७३ मुले व २८९६१ मुली असे एकूण ६११३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३०६५७ मुले उत्तीर्ण तर २८०७८ मुली उत्तीर्ण असे एकूण ५८७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९५.२८ % मुले व ९६.९५ % मुली असा एकूण ९६.०७ टक्के निकाल लागला आहे.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे मा. पालकमंत्री जिल्हा पालघर, मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, मा. जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा, मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पालघर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर, मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पालघर. व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी अभिनंदन केले आहे.