बोईसर :- जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यापेक्षा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संपवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी हे जिल्हाध्यक्ष यांच्यावर नाराज असल्याने पक्षाचे अध्यक्ष श्री. अजित पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याबाबत जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हातील पदाधिकारी लवकरच पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष यांच्या बाबत काही निर्णय घ्या. अन्यथा आमचे राजीनामे घ्या.अशी भूमिका सध्या जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी घेतली आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष आनंद भाई ठाकुर यांच्याकडून कोणतीही सूचना न देता, शिवाय विश्वासात न घेता पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करता पक्ष संपविण्याचा प्रयत्न करताना ते दिसून येत असल्याचे पदाधिकारी यांच्या कडून बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा शरद पवार यांच्यातून वेगळे होत अजित दादा यांनी नवीन गट स्थापन करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा धुरा आपल्या हातात घेतला. त्यानंतर पक्ष प्रमुख अजित पवार यांनी पक्ष वाढी साठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.मात्र पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपविण्याचे काम करतांना दिसून येत असल्याने पालघर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते हे नाराज झाले आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते हे जिल्हाध्यक्ष मा. आमदार आनंद भाई ठाकुर यांच्या विरोधात एकत्र येत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेणार असल्याबाबत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी सांगितले.