बोईसर पोलिसांनी केला 24 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड गॅस सिलेंडरचे गोडावून फोडणाऱ्या विजयशंकर गुप्ता टोळीचा छडा लागला! एकाला अटक दोघे फरार; 100 गॅस सिलिंडर जप्त.

पालघर: गॅस सिलेंडर बाटल्यांची चोरी करणाऱ्या एकास गजाआड करण्यात  बोईसर पोलिसांनी यश मिळवले आहे. दांडी पाडा येथे राहणाऱ्या कुख्यात अपराधीनी गॅस सिलिंडर चोरीकांड घडवले होते. आरोपीकडून 100 गॅस सिलिंडर जप्त करुन बोईसर पोलिसांनी चोविस तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे. बोईसर शहरातील चंद्रानी फार्म हाऊस, डि.सी कंपनी समोर पालघर येथील गॅस एजन्सीचे गोडाऊन आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास एजन्सीच्या गोडाऊनचे कुलुप तोडुन गोडावुनमध्ये प्रवेश करुन १ लाख ३५,००० हजारांचे प्रत्येकी ०५ किलोग्रॅम वजनाचे एफ.टी.एल कंपनीचे गॅसचे १०० बाटले चोरट्याने चोरी करुन चोरून नेले होते. या गुन्ह्याची तक्रार मनोज लक्ष्मीकांत बाजपेई यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विठ्ठल मणिकेरी व बोईसर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्यात कोणतेही धागेदोर अथवा सि.सी.टि.व्ही फुटेज नसताना गोपनीय माहितीच्या आधारे दांडीपाडा येथे किराणा दुकान चालविणारे विजयशंकर रामसबद गुप्ता (वय-३५ वर्षे) यास सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडुन संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच बज्जु जगताप व त्यांचे अन्य फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Previous Post Next Post