पालघर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सत्ताधारी आणि विरोधकांचाही जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचा सांगितलं जातंय . 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे . यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसली असून महाविकास आघाडीत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली . मतदारसंघ आपणच लढवावा असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून सध्याचे डहाणू मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद निकोले हेच पुन्हा सिपीएम पार्टीचे डहाणू विधानसभेचे उमेदवार असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे . विनोद निकोले यांच्या नावाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या राज्य आणि जिल्हा कार्यकारणी कमिटीच्या बैठकीत एक मताने मंजुरी देण्यात आली असून महाविकास आघाडीने देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.