जव्हार: पालघर जिल्ह्याला निसर्गतः लाभलेले पर्यटन हे पर्यटकांना मुख्य आकर्षण आहे.यात आणखी वृध्दी होऊन या भागाची जागतिक पर्यटन म्हणुन जगामध्ये ओळख निर्माण होणेसाठी पालघर जिल्हा निर्मितीचे शिल्पकार माजी खासदार राजेंद्र गावित नेहमी अग्रही राहिले आहेत.दरम्यान, पर्यटन विभागाने महाराष्ट्रात ५ ठिकाणी २०० कोटी निधी देऊन पर्यटनाचा विकास व्हावा, जागतिक पातळीवर अश्या ठिकाणांना वेगळी उंची मिळावी अशी धोरणे आखली आहेत.म्हणुन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना माजी खासदार गावित यांनी भेट घेत पर्यटनाचा ब दर्जा मिळालेल जव्हार हे ठिकाण विकसित ५ पर्यटन स्थळांच्या संभाव्य यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. यावर पर्यटन मंत्री यांनी सकारत्मकता दाखवीत प्रशासनला या नव्या आराखड्यात जव्हारचा समावेश करावा असे आदेश दिले असल्याने जव्हार पर्यटनाला वाव मिळेल, रोजगार उपलब्धता, आर्थिक नियोजन सुधारेल या हेतूने येथील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राजेंद्र गावित हे पालघर जिल्यातील मंत्री , दोन वेळा खासदार राहिल्याने येथील भौगोलिक परिस्थिती, प्रशासन पूर्णपणे ज्ञात आहेत. त्यांच्या नेतृत्वाची शैली बाबत सर्वच समाजात आणि राजकीय पक्षांत त्यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जव्हारला पर्यटनाच्या दृष्टीने विकासाची संधी उपलब्ध करण्यासाठी गावितांनी नेहमीच प्राथमिकता दिली आहे.