पालघर: आदिवासी धोडिया समाजातील मुख्य धार्मिक सणापैकी एक प्रमुख सण म्हणजे "दिवाहो". धोडिया आदिवासी समाज हा सण खूप उत्साहाने तसेच पारंपरिक वाद्य वाजवून साजरा करत असतो. पावसाळा सुरू झाला की आदिवासी धोडिया समाजात सणांना सुरुवात होत होते आणि आषाढ महिन्यात "दिवाहो" हा सण येत असतो. आठवड्यापूर्वी ह्या सणाची तयारी चालू होते या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे "धिंगला" "धिंगली" चे लग्न. आदिवासी धोडिया समाजातील लग्न पद्धतीनुसार "धिंगला धिंगली" चे लग्न लावण्यात येते. आदिवासी धोडिया संस्कृती प्रमाणे "ढिंगला धिंगली" चे गाणे गायली जातात. लहान मुलांमध्ये खास उत्साह बघायला भेटतो. अंगणात "ढिंगला धिंगली" साठी मंडप बनवण्यात येतो. "धिंगला धिंगली" ला हळद लावण्यात येते. पाटावर बसून बाशिंग बांधण्यात येते तसेच गावात एकमेकांच्या घरी "धिंगला धिगली" फिरवण्यात येत असते. धिगला धिंगली ना बसविण्यासाठी जे साधन बनवण्यात येते त्यास "तरापो" असे म्हटले जाते, तरापो बनवून मंडपात त्यांना बसवले जाते. ह्या दिवशी आदिवासी धोडिया समाजात विविध प्रकारचे पक्वान्न बनवले जातात ते पक्वान्न मंडपात पानावर ठेवले जातात. नवीन लग्न झालेली नवविवाहित वधू सासर हुन आपल्या माहेरी येत असते इतर मुलींप्रमाणे ही नवविवाहिता देखील "धिंगला धिंगली" बनवत असते तसेच धिंगला धिंगली ची गावात पारंपारिक वाद्य वाजवून वाजत गाजत गावात मिरवणूक काढून वाहत्या पाण्यात तरापोमध्ये बसवून वाहत्या पाण्यात सोडून देण्यात येते. त्याक्षणी ते ढिंगला धिंगली काल्पनिक नसून आपल्या घरातील सदस्य असल्याची भावना मनात जागृत होत असते. अशाप्रकारे धींगला धिंगली ना निरोप देवून सण साजरा केला जातो आज दिवोहो सण हा रानिशिगाव गावात साजरा करण्यात आला ह्या वेळी रूपेश सुरेश धोडी, अजय लक्समन धोडी, प्रवीण नारोत्तम धोडी, नितिन दिलीप धोडी, जोगेश लक्समन धोडी आणी सर्व राणी शिगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते