डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी उमटवला कामाचा ठसा ठाणे येथील मुरबाड येथे झाली बदली.


डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार कोली यांची वर्णी लागली असुन त्यांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, साडेतीन वर्षांच्या काळात तहसीलदार अभिजित देशमुख यांनी कोविड काळातील काम वाखाणण्याजोगे होते.
त्याचबरोबर तहसील कार्यालयात आलेल्या जनसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्काळ मार्गी लागाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याने तालुक्यात त्यांनी साडेतीन वर्षांच्या काळात आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविला होता. 'शासकीय काम म्हणजे बारा महिने थांब' अशी म्हण जनमानसात रूढ झाली आहे; परंतु याला तिलांजली देऊन शेतकरी असो वा सर्वसामान्य नागरिक तहसील कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आस्थेवाईकपणे विचारपूस करून प्रत्येकाचे काम तत्काळ झाले पाहिजे. विनाकारण ताटकळत बसू देऊ नका, असा आग्रह धरून अभिजित देशमुख आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून करून घेत असे.

कोविड काळात लॉकडाउनमध्ये गरीब कुटुंबाना शिधावाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप, वसतिगृहात क्वारंटाइन सेंटर उभारणी आदी कामे त्यांनी केली. याच दरम्यान स्वतःला कोविड झाला; परंतु त्यांनी त्याची तमा न बाळगता तब्येत सुधारल्यावर पुन्हा आपले कार्य सदोदित चालू ठेवले. याच दरम्यान आपण अधिकारी आहोत, असा आविर्भाव कधीही त्यांनी आणला नसल्याचे डहाणूतील नागरिक सांगतात.

निवडणुका शांततेत

अभिजित देशमुख यांच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा, जिल्हा परिषद, तालुक्यातील पंचायत समिती सार्वत्रिक व पोटनिवडणूक, ग्रामपंचायत सार्वत्रिक आधी निवडणुका शांततेत व कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पाडल्या. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मतदारयादीशी आधार जोडणीचे काम केले.

डहाणू किल्ला परिसरात फुलविली बाग

पालघर जिल्ह्यात १६ व्या शतकात उभारलेल्या डहाणू या ऐतिहासिक किल्ल्याचा कायापालट करण्यात आला .तसेच येथील कार्यालयांचे किल्ल्याच्या अस्तित्वाला कोणताही धक्का न पोहोचवता डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या प्रयत्नाने सुशोभीकरण करण्यात आले आहे.या किल्ल्यात कार्यरत असलेल्या प्रशासकीय कार्यालयांनाही सद्या नवी झळाळी मिळाली असून डहाणूतील नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी ही कार्यालये आणि किल्ला आकर्षणाचा केंद्रिबदू ठरले या किल्ल्याची काही वर्षा पासून दुरवस्था झाली होती. या किल्ल्यात असलेल्या अवशेषात चार बुरूज, दोन तोफा, एक पडकी विहीर, महाद्वार यांचा समावेश होता. या किल्ल्यातील बुरूज ढासळलेले व वृक्षांमुळे भिंतीला तडे गेले होते लोकसहभागातून सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्राच्या किल्ल्याचा गेल्या तीन वर्षात कायापालट अभिजित देशमुख यांच्या कडून करण्यात आला आहे.
Previous Post Next Post