सिटी पारेख पेट्रॉलपंपावर झाली आगीची रंगीत तालिम

पालघर: दिनांक १९.१२.२०२४ रोजी गुजरात गॅस लिमीटेड यांच्या मार्फत पालघर शहरातील सिटी पारेख पेट्रॉलपंपावर सकाळी १०.४५ च्या दरम्यान गाडीतील गॅसचा बाटला पेट घेतल्याने जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. अग्नीशमन दलाने सदरची आग विझवण्यात यश मिळवले. जखमी झालेल्या लोकांना प्रथमोपचार देऊन तात्काळ रुग्णवाहीके व्दारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलीस विभागाकडून ट्रॅफीकचे व कायदा सुव्यवस्थेचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात आले. तसेच सदर रंगीत तालीमचे नियंत्रण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत करण्यात आले. अशा प्रमाणे रंगीत तालीम संपन्न झाली सदर रंगीत तालीमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, पोलीस निरिक्षक अनंत पराड, पोलीस उपनिरिक्षक बालाजी मुंडे, आयटी साहय्यक विक्रांत दांडेकर, गुजरात गॅस लिमीटेडचे सर्कल हेड श्री. भावेश दवे व शिवकुमार आणि त्यांची टिम, आरोग्य विभाग, अग्नीशमन विभाग सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदविला
Previous Post Next Post