डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थीची पटसंख्या जास्त दाखवून लुटला शासनाचा निधी.

पालघर
 डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे लाखो रुपये लाटले जात असल्याची माहिती समोर आली आहे .

 ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कमी पटसंख्या असताना देखील ही पटसंख्या वाढवून विद्यार्थ्यांच्या नावावर पोषण आहार , अंडी , स्कॉलरशिप तसंच शासनाच्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना लाटून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आल आहे .

 हे सगळं राजरोष पणे सुरू असताना देखील डहाणू पंचायत समिती शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय . ग्रामीण भागात शाळांमध्ये कमी विद्यार्थी शिक्षण घेत असताना ही विद्यार्थ्यांची संख्या वाढवून शासनाचे पैसे लाटले जात असतानाच या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक सुद्धा यात सामील असल्याचा आरोप आता सामाजिक संघटनांकडून केला जाऊ लागला असून यामध्ये सामील असलेल्या सरकारी अधिकाऱ्या वर्ती तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Previous Post Next Post