पालघर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बोईसर येथे भव्य आख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ६ जून रोजी सकाळी १० वाजता बोईसर येथील टीमा हॉलमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन
संकल्प युवा प्रतिष्ठान बोईसर, युवा शिवसेना संघटना बोईसर यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून
शिवप्रेमी नागरिक, युवक-युवती तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व इतिहासाचा गौरव करणारे आख्यान सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच युवा शिवसेना कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून इतिहास, संस्कृती आणि स्वराज्याच्या विचारांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.