पालघर तहसील कार्यालयाच्या हद्दीतील मंडल अधिकारी कुरगाव परिसरात मोठ्या प्रमाणात माती व मुरूमाचे गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत असून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कुरगाव , मुंडवली, या परिसरात महसूल विभागाकडून कोणतीही रॉयल्टी न घेता दिवस-रात्र जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती व मुरूम उपसा सुरू आहे. उत्खननासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसून तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने, याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
काही नागरिकांनी कुरगाव च्या मंडल अधिकारी व संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व त्याच्या आशीर्वादामुळे हे उत्खनन सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून या अधिकाऱ्या वर्ती व उत्खनन करणाऱ्या माफिया वरती योग्य ती कारवाई करण्याची मागणी जोर आहेत.
या दरम्यान, अवैध उत्खननामुळे महसूल विभागाला आर्थिक नुकसान होत असल्याबरोबरच रस्त्यांची दुरवस्था, धूळ प्रदूषण आणि पर्यावरणीय हानी यांसारख्या समस्या निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार या विभागाने तत्काळ दखल घेऊन संबंधित ठिकाणाची पाहणी करावी व नियमबाह्य उत्खनन आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कोट -
सुनील राठोड़
मंडल अधिकारी कुरगाव
तक्रार प्राप्त झाल्या नंतर अवैधरित्या सुरू असलेल्या उत्खननांना वर्ती कारवाई करण्यात येईल.