वाणगावमधील बांधकाम व्यावसायिक आणि राजकीय नेत्याच्या मुलाला ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न; बोईसर येतील सलून व चिंचणी कोटिम येथील तील दलालांच्या टोळीकडून बदनामीचे षडयंत्र.

 वाणगाव परिसरातील एका प्रतिष्ठित जमीन व बांधकाम व्यावसायिकाला तसेच एका स्थानिक राजकीय नेत्याच्या मुलाला काही दलालांकडून ब्लॅकमेल करून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोईसरमधील एका प्रसिद्ध सलूनशी संबंधित व्यक्ती आणि चिंचणी (कोटीम) परिसरातील काही दलालांनी एकत्र येऊन हे षडयंत्र रचल्याची चर्चा सध्या परिसरात जोरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकाम व्यावसायिकाची आणि राजकीय नेत्याच्या मुलाची समाजात असलेली प्रतिमा मलिन करण्यासाठी या टोळीकडून विविध मार्गांनी दबाव टाकला जात आहे. आर्थिक फायद्यासाठी किंवा वैयक्तिक द्वेषातून या दोघांना लक्ष्य केले जात असून, खोटे आरोप व अफवा पसरवून त्यांची बदनामी करण्याचा डाव या दलालांनी आखला आहे..

बोईसर येथील एका नामांकित सलूनच्या आडून काहीजण या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारात सक्रिय असल्याची कुजबुज आहे, तर चिंचणी कोटीम भागातील काही दलाल याला खतपाणी घालत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे वाणगाव, बोईसर आणि चिंचणी परिसरातील व्यावसायिक व राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंग आणि बदनामीच्या षडयंत्राला बळी न पडता संबंधित दलालांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि व्यावसायिक वर्गातून होत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post