वाढवण बंदर प्रकल्पातील जमीन मोबदल्याच्या रकमेचा अपहार करणाऱ्यां विरोधात बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

पालघर | वाढवण बंदर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मोठा गैरप्रकार समोर आला असून, एका आदिवासी शेतकऱ्याच्या खात्यातून तब्बल ५० लाखांहून अधिक रक्कम परस्पर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी किरण पांडु पालवा, यांच्या तक्रारीनुसार, वाढवण बंदर प्रकल्पासाठी त्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा सुमारे २ कोटी ९१ लाख रुपयांचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा होणार होता.

मात्र आरोपी सूरज गिंभल, धर्मा वळवी आणि प्रसाद उर्फ मॉन्टी पाटील यांनी फिर्यादीच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेत मोबदला लवकर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादीला बोईसर येथील खासगी बँकेत नेऊन विविध कागदपत्रांवर सही व अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या खात्याशी स्वतःचे मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी लिंक करून खात्यातून ५० लाख  २७ हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्यात आली. 

या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Previous Post Next Post