सकल मराठा बहु. सामाजिक संस्था व सर्व शिवप्रेमीं आयोजित शिव जयंती उत्सव उत्साहात संपन्न; २७ शाळांतील १५० विद्यार्थी व हजारो नागरिक सहभागी !

बोईसर: दिनांक १९, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीचा सोहळा सकल मराठा बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सर्व शिवप्रेमींच्या वतीने दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील १० वर्षांपासून सातत्याने राबवला जाणारा हा १० वा उत्सव बालकांच्या मनात शिवरायांचे विचार व आदर्श रुजविण्याचा व सदृढ समाज निर्मितीच्या ध्येयाने आयोजित करण्यात येत आहे. यावेळी परिसरातील २७ शाळांतील जवळपास १५० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, तर हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोहळ्याला यशस्वी केले. 
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये अशी होती की, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील भाषण स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य व गायन स्पर्धा, गडकिल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे भजन, भक्ती गीते व धार्मिक गायनाने वातावरण भक्तिमय झाले. भव्य मिरवणुकीत पारंपरिक ढोल, ताशा, लेझिम, हलगीसह इतर वाद्यांचा समावेश होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार तर विजेत्या स्पर्धकांना विशेष बक्षिसे देण्यात आली. याशिवाय, मोफत आरोग्य तपासणी शिबिरही राबवले गेले. या उपक्रमाद्वारे शिवरायांचे विचार, आदर्श व जीवनमूल्ये मुलांमध्ये रुजवत सदृढ समाज निर्मितीची कटिबद्धता दाखवली गेली. संस्थेच्या प्रयत्नांमुळे बोईसर परिसरातील सांस्कृतिक जागृती वाढत असल्याचे दिसून आले. संस्थेचे पदाधिकारी व आयोजकांनी सर्व सहभागींना धन्यवाद व आभार मानत, संस्था नियमित अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. 

हा शिव जन्मोत्सव उत्साहात संपन्न करण्यासाठी, बबनराव जाधव, नानासाहेब साठे, बाळासाहेब विचारे, राजेंद्र थोरात, विजय बागल, विजय देशमुख, संजय मराठे, संतोष चव्हाण, चंद्रहार नलावडे, विश्वास जगताप, बाजीराव कापरे, मधुकर गायकवाड, गजानन मोहिते, प्रतापराव पाटील, भाऊसाहेब पाटील, विलास अहिरेकर, आदी समिती सदस्यांचे आर्थिक व मोलाचे सहकार्य लाभले. 
अनिल पाचांगने, बापूराव काळे, विजय बोपर्डीकर, संतोष दांडगे, विठोबा मराठे, दयानंद कांबळे इत्यादी शिवप्रेमींचे सहकार्य लाभले.
Previous Post Next Post