बोईसरमध्ये बेटेगाव येथे देवी विसर्जनास मनाई; कुंभवली आणि नांदगाव येथे विसर्जनाचे आवाहन

बोईसर, पालघर : बेटेगाव येथे पाण्याची गुणवत्ता खराब असून पाण्याची पातळीही कमी असल्याने यंदा या ठिकाणी देवी विसर्जन करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर बोईसर पोलीस ठाण्यात सर्व सार्वजनिक व खासगी मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत देवी विसर्जनासाठी पर्यायी ठिकाणांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

बोईसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी देवी विसर्जनाच्या नियोजनाबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार, यंदा देवी विसर्जनासाठी कुंभवली कुंड आणि नांदगाव या दोन पर्यायी ठिकाणांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेटेगाव येथील पाण्याची खराब गुणवत्ता आणि कमी जलसाठा लक्षात घेता सार्वजनिक तसेच खासगी मंडळांनी पर्यायी विसर्जन स्थळांचा वापर करावा, असे सांगण्यात आले.

देवी विसर्जनादरम्यान कोणतीही गैरसोय किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून विसर्जनाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post