डहाणूत जमीन घोटाळा उघड; खोटे मृत्यू दाखले दाखवून 16 एकर जमीन विकल्याचा दावा

पालघर - डहाणू | खोटी कागदपत्र सादर करून एका शेतकऱ्याच्या मालकीची आणि कब्जावहिवाटीतली तब्बल 16 एकर जमीन परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार डहाणू तालुक्यातील उर्से या गावी समोर आला आहे . या विरोधात तक्रारदार विजय जाधव यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . विजय जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे डहाणू तालुक्यातील उर्से येथे सोळा एकर मालकी जमीन आहे . विशेष म्हणजे ही सर्व जमीन त्यांच्या कब्जावहिवाटीत असताना देखील सामायिक क्षेत्र असल्याने याच गावातील काही कुटुंबांनी त्यांची जमीन परस्पर विक्री केल्याचं या तक्रारीत सांगण्यात आल आहे . खरेदी विक्री करताना कोट्यावधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असून रजिस्ट्रेशन करताना खोटे मृत्यू दाखले , ग्रामपंचायत ची खोटी कागदपत्र तसच अनेक कागदपत्रांवर खोट्या सह्या असल्याचं समोर आल आहे . या सर्व व्यवहारात काही शासकीय अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याच विजय जाधव यांनी आपल्या तक्रारीत सांगितल . या संदर्भात जमीन मालक विजय जाधव यांनी काल पत्रकार परिषद घेत खोटी कागदपत्र सादर करून फसवणूक करणाऱ्या विरोधात तसंच आपली जमीन परस्पर हडप करणाऱ्यांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . सध्या पालघर मध्ये वाढवण बंदराच्या उभारणीच्या कामांना वेग आला असल्याने डहाणू सह परिसरातील जमिनींना मोठी मागणी आली आहे त्याचा फायदा घेऊन आपली फसवणूक करण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलं .
Previous Post Next Post