पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे गाजत असलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणातील फरार आरोपीला अटक करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या शोधासाठी पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून ठिकाणी विविध ठिकाणी तपास करत होते त्या नंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणे, त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करणे व त्याद्वारे धमकावल्याच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटने नंतर आरोपी फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहीम राबवली.
अखेर पोलिसांनी सापळा रचून फरार आरोपीला भरूच येथून ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डहाणू येते विविध हिंदू संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा SIT स्थापन करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे.
आरोपीच्या अटकेमुळे तपासाला आणखी गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.