दिनांक १७/०५/२०२६ रोजी सायंकाळी वेळ ४.४९ ते ६.३८ वाजेच्या दरम्यान फिर्यादी श्री. विनीतकुमार मुंशीलाल मीणा, वय २८ वर्ष, रा. वागुळसार पालघर पश्चिम हे त्यांच्या राहते घरी असतांना, त्यांचे व्हॉट्सअॅप क्रमांकावर अज्ञात धारकाने त्याचे व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर पालघर जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी यांचा फोटो लावुन स्वतः "जिल्हाधिकारी श्रीमती इंदु राणी जाखड़ असल्याची खोटी ओळख दाखवुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून, फिर्यादी यांना बँक खातेक्रमांक देवुन त्यावर ५०,०००/- रुपये पाठविण्याचा व्हॉट्सअॅप मेसेज पाठविला. त्यावरुन फिर्यादी यांनी पैसे पाठविले. तद्नंतर आरोपीत यांनी मा. जिल्हाधिकारी यांचा फोटो लावुन फिर्यादीची फसवणुक केल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ०१/२०२६ भा.न्या.स. कलम ३१८(४), ३१९(२) सह माहीती तंत्रज्ञान अधिनीयम २००० कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे दिनांक १८/०१/२०२६ रोजी दाखल आहे.
गुन्हयातील फिर्यादी यांनी पैसे ट्रान्सफर झालेल्या बँक खातेधारकाची माहिती मिळवून तांत्रिक विश्लेषण करून अधिक तपासाअंती आरोपी १) बलवंतकुमार कमलप्रसाद मंडल, वय २६ वर्षे, रा. मनोरमनगर कला भवन जवळ ता. जि. धनबाद राज्य झारखंड २) राजुकुमार दुखन खानी, वय २२ वर्षे, रा. बैंक कॉलोनी, के. जी. आश्रम गोविंदपुर, धनबादता. जि. धनबाद राज्य झारखंड यांना जि. धनबाद, राज्य - झारखंड येथुन अटक करुन गुन्हयातील अपहरीत रक्कम ५०,०००/- रुपये हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, अतिरिक्त, कार्यभार सायबर पोलीस स्टेशन, पालघर हे करत आहेत.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रदिप पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, अति, कार्यभार सायबर पोलीस स्टेशन, पालघर, पोलीस उपनिरीक्षक, समीर भोसले, नेम-सायबर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक, रोहित खोत, पोलीस उपनिरीक्षक, विशाल शिर्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, राजेश वाघ, पोहवा/संजय धांगडा, पोहवा/कपील नेमाडे, नेम स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोअंम./रामदास दुर्गेष्ट, पोअं/ रुपेश पाटील, पोअं/अक्षय शेट्ये मपोअं/ऋषिका बारी, मपोअं/स्नेहल शेलार नेम पोलीस स्टेशन, पालघर यांनी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.