पालघर दि. १२ : जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार उप आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह निमित्ताने दिनांक १२ जुन २०२६ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी, सुभाष भागडे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी मोहिम तसेच पालघर रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालय या परिसरात अभिनव शिक्षण संस्था या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यावेळी कामगार उप आयुक्त, विजय चौधरी पालघर, सहायक कामगार आयुक्त, दिनेश दाभाडे सहायक कामगार आयुक्त, प्रशांत महाले, सरकारी कामगार अधिकारी, गोपाळ पाटील, दुकाने निरीक्षक आणि कामगार उप आयुक्त, अभिमन देवरे, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
रॅलीच्या समारोपावेळी पालघर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.