बोईसरमधील खैरापाडा ब्रिज ते यशवंत सृष्टीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातानंतर युवासेना पालघर जिल्ह्याचे सौरभ आप्पा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात एका महिला दुचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर सौरभ आप्पा यांनी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे आणि जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. या धोकादायक खड्ड्यामुळे आणखी अपघात होण्याची शक्यता असल्याने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.