Palghar Rain Update | पाचमाड पूल पाण्याखाली; मनोर–विक्रमगड मार्ग बंद, वाहतूक ठप्प

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील पाचमाड येथील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मनोर–विक्रमगड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून, त्यामुळे मनोरमार्गे नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

पुलावर पाणी असल्याने वाहनचालकांनी या मार्गाचा वापर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
Previous Post Next Post