पालघर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी...
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी वाणगाव येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून, २२ नामांकित कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.
उमेदवारांनी महास्वयम् पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून रोजगार मेळाव्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच मेळाव्यास येताना बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, बँक खाते तपशील आणि आवश्यक कागदपत्रांच्या किमान पाच प्रती सोबत आणाव्यात.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी ०२५२५-२९९८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.