आमदार विलास तरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान व शिधावाटपवाढदिवसाचा खर्च टाळून सामाजिक उपक्रमाला प्राधान्य

बोईसर : प्रतिनिधी 
शिवसेनेचे बोईसर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसर-तारापूर परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून कंबोडे, तारापूर येथील सिद्धी सिनियर सिटीजन होम या वृद्धाश्रमात अन्नदान तसेच शिधावाटप करण्यात आले.

आमदार विलास तरे यांचा वाढदिवस १९ सप्टेंबर रोजी असून, पालघर जिल्ह्यातील विविध सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मोठा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याऐवजी वाढदिवसाचा खर्च समाजोपयोगी उपक्रमासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधत त्यांच्या गरजांची माहिती घेतली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अजय दिवे यांनी अन्नदानाचे महत्त्व अधोरेखित करत गरजू व ज्येष्ठ नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले.

या उपक्रमास ज्येष्ठ नेते व समाजसेवक प्रभाकर विचारे, शिवसेना अल्पसंख्याक सेलचे झाकीर सेठी, बोईसर शहरप्रमुख अतुल देसाई, नापेश संखे, माजी पंचायत समिती सदस्य अजय दिवे, भीमनगर शाखाप्रमुख विनय करोतीया, हर्षल पटवार, कुणाल बागुल, सुभाष दुबे, जिलेदार वर्मा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

वाढदिवसाचा जल्लोष करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालविण्यात आला. या माध्यमातून समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचा संदेश देण्यात आला.
Previous Post Next Post