ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार प्रचार मोहीम; विकासाच्या मुद्द्यांवर भर.

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या पाठिंब्याने उभ्या असलेल्या परिवर्तन पॅनलने सहकार क्षेत्राच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री गणेश नाईक, तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील पालघर चे खासदार डॉ. हेमंत सावरा भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची प्रचार मोहीम वेगाने सुरू असून पॅनलच्या उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद असल्याच समोर येत आहे.

परिवर्तन पॅनलच्या वतीने विविध भागांत बैठका, कार्यकर्ता मेळावे आणि मतदार संपर्क अभियान राबविण्यात येत असून बँकेचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार, आधुनिक बँकिंग सुविधा, शेतकरी व सभासद हिताचे निर्णय तसेच सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधला जात आहे.
प्रचारादरम्यान परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी बँकेच्या प्रगतीसाठी दूरदृष्टीपूर्ण नियोजन आणि सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरणारा कारभार देण्याचे आश्वासन दिले.

 विकासाभिमुख विचारसरणी आणि सक्षम नेतृत्वाच्या बळावर परिवर्तन पॅनल विजयी होईल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सभासदांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. 

परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधत आपल्या भूमिका आणि विकासाचा आराखडा मांडण्यावर भर दिला आहे.

परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी जिल्ह्यातील विविध सहकारी संस्था, पतसंस्था, ग्राहक संस्था, गृहनिर्माण संस्था तसेच इतर मतदार संघांतील प्रतिनिधींशी भेटीगाठी घेत बँकेच्या भविष्यातील विकास आराखड्याची माहिती दिली. बँकेची आर्थिक मजबुती, डिजिटल सेवा विस्तार, शेतकरी व सहकारी संस्थांना अधिक सक्षम आर्थिक पाठबळ, तसेच पारदर्शक व उत्तरदायी कारभार यावर भर देण्यात येत असल्याचे पॅनलकडून सांगण्यात आले.

यावेळी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून, सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या घोषवाक्याच्या माध्यमातून सर्व घटकांना सोबत घेऊन बँकेच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प उमेदवारांनी व्यक्त केला.

मतदान २७ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिवर्तन पॅनलकडून करण्यात आले आहे.

परिवर्तन पॅनलचे उमेदवार

 1 - श्री. प्रभू गोविंद पाटील

 सहकार पतसंस्था नागरी सहकारी संस्था मतदार संघाचे उमेदवार

2 - श्री सिताराम बाजी राणे खरेदी-विक्री संघ, मजदूर कामगार सहकारी संस्था, गृहनिर्माण व इतर संस्था मतदारसंघाचे उमेदवार

3 - सौ. दिपाली सुरेंद्र पाटील

 महिला राखीव मतदार संघाचे उमेदवार

4 - ऍड. सुवर्ण उदय पावशे

 महिला राखीव मतदार संघाचे उमेदवार

5 - श्री.पांडुरंग महादू वरोरा

 अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघाचे उमेदवार

6 - श्री. राजेंद्र शांताराम घोलप

 विमुक्ती जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग मतदार संघाचे उमेदवार

7 - श्री हार्दिक रवींद्र राऊत

 इतर मागासवर्ग मतदार संघाचे उमेदवार
Previous Post Next Post